औंढ्यात दीड लांखावर भाविक

औंढ्यात दीड लांखावर भाविक
Published on
फोटोसह ABD26J78303, ABD26J78304 शिरड शहापूर ः तिसऱ्या श्रावण सोमवारी ज्योतिर्लिंग प्रभूश्री नागनाथांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात उसळलेली गर्दी. (दुसऱ्या छायाचित्रात) मंदिर समितीचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते सपत्नीक दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली. ------------------------------- औंढ्यात दीड लाखावर भाविक प्रभूश्री नागनाथांच्या चरणी लीन ---------------- तिसरा श्रावण सोमवार; मोठा बंदोबस्त तैनात शिरड शहापूर, ता. ३१ (बातमीदार)ः औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू श्री नागनाथांच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारीही (ता.३१) शिवभक्तांनी मोठी गर्दी केली. दिंड्या, कावड पताका घेऊन शिवभक्त रविवारी (ता.३०) सायंकाळीच औंढा नागनाथ येथे दाखल झाले होते. दिवसभरात दीड लाखावर शिवभक्तांनी दर्शन घेतले. मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते सपत्नीक दुग्धाभिषेक व महापूजा केल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास श्री नागनाथांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर शिवभक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंदिर संस्थांकडूनही भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले होते. पहिल्या दोन श्रावण सोमवारी प्रत्येकी दीड लाखावर भाविकांनी श्री नागनाथांचे दर्शन घेतले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता या ठिकाणी संस्थानतर्फे गर्भगृहातील अभिषेक पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. मंदिर संस्थान सल्लागार समितीचे आमदार संतोष बांगर, मंदिराचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीतर्फे भाविकांना रांगेत पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रचंड गर्दी वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, विभागीय पोलिस अधिकारी सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वरिष्ठ अधिकारी, पाच पोलिस निरीक्षक, २० एपीआय, पीएसआय, ८० महिला, पुरुष अंमलदार, ८० महिला पुरुष होमगार्ड, पोलिस पाटील यांच्यासह दोन एसआरपी प्लाटून यांचा मोठा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती बंदोबस्त प्रभारी पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com