

Naigaon ZP junior engineer suicide case
sakal
नायगाव : जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग नायगाव येथे प्रतिनियुक्तीवर असलेले कनिष्ठ अभियंता विलास बल्लूरे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयातच पहील्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ( ता. ३१) जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. कार्यालयाला आतून कुलूप लावलेले असल्याने चावी मागवण्यात आली पण सायंकाळी पाच वाजेपर्यंत नातेवाईकांनी गेटचे कुलूप काढू दिले नसल्याने आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला नाही.