ऑगस्टमध्ये पोलिसांची धडक मोहीम; ४०१ गुन्हे दाखल

ऑगस्टमध्ये पोलिसांची धडक मोहीम; ४०१ गुन्हे दाखल
Published on
नांदेड पोलिसांची धडक कारवाई ७९७ जणांवर गुन्हे; १० कोटींचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ६ : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात विविध पातळ्यांवर धडक मोहीम राबवली. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंदे, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रांविरोधात केलेल्या कारवाईत ४०१ गुन्हे दाखल करून ७९७ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल १० कोटी ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये दारूबंदीचे सर्वाधिक २३०, जुगाराचे ८६, रेतीचे ३८ आणि गुटख्याचे १६ गुन्हे दाखल झाले. मुखेड आणि भाग्यनगर परिसरातील खूनांच्या गंभीर प्रकरणांची अवघ्या काही तासांत उकल करून आरोपींना जेरबंद करण्यात आले. तसेच चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए व एमसीओसीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली. २०११ पासून फरार असलेला आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. महिला सुरक्षा व दोषसिद्धीवर भर महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक आणि नागरिकांसाठी चार्ली पेट्रोलिंग पथक कार्यरत असून जनजागृतीवर भर दिला जात आहे. ‘ट्रायल मॉनिटरिंग सेल’च्या प्रभावी पाठपुराव्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोन पोक्सो प्रकरणांत जन्मठेप, तर एका खून प्रकरणात ७ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हेगारीविरोधातील ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com