नांदेड डाक विभागात ३० ऑक्टोबरला थेट मुलाखती

नांदेड डाक विभागात ३० ऑक्टोबरला थेट मुलाखती
Published on: 
डाक जीवन विमा प्रतिनिधी होण्याची सुवर्णसंधी -------- नांदेड डाक विभागात ३० ऑक्टोबरला थेट मुलाखती --- नांदेड, ता. २७ : भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजनांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड डाक विभागाकडून थेट विमा प्रतिनिधी (डायरेक्ट एजंट) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग येथे घेण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य शासनाने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बेरोजगार व स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, माजी विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी विमा प्रतिनिधी, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याविषयीचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक भागाची माहिती या बाबींची तपासणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला पाच हजार रुपये सुरक्षा ठेव राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) किंवा किसान विकासपत्र (केव्हीपी) स्वरूपात जमा करावी लागेल. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com