जिल्ह्यात केवळ ४२ हजार
५४० हेक्टरवर रब्बीची पेरणी
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. ५ : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीला संथ गती मिळाली असून, ३ नोव्हेंबरअखेर ४२ हजार ५३९.९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या अंतिम पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १०.८८ टक्के आहे. जिल्ह्याचे रब्बी पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ३२ हजार ४१५ हेक्टर आहे.
हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४२ हजार ५१२ हेक्टर असून, आतापर्यंत २९ हजार ३४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४०४ हेक्टर असून, ७ हजार ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४० हजार १५० हेक्टर असून, आतापर्यंत ४ हजार ५९१.२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याची पेरणीही अवघी १५६.८ हेक्टरवर झाली आहे.
----
गळीतधान्यांची पेरणीही पिछाडीवर
करडई, तीळ, सूर्यफूल, जवस आणि मोहरी या गळीतधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र ६ हजार ९७९ हेक्टर असून, आतापर्यंत ७९३.१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनेक भागांत पाण्याची उपलब्धता नसल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे.
----
इसापूर धरणातून दोन आवर्तने
रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिले आवर्तन ३ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, दुसरी आवर्तन नियोजित वेळेत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात जिल्ह्यातील रब्बी पेरणीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.