नर्सी येथे दोन पांदण रस्त्यांच्या कामाला प्रारंभ; शेतकऱ्यांचा शेतापर्यंतचा प्रवास होणार सुकर

नर्सी येथे दोन पांदण रस्त्यांच्या कामाला प्रारंभ; शेतकऱ्यांचा शेतापर्यंतचा प्रवास होणार सुकर
Published on: 
ABD26J82697 नरसी नामदेव ः येथे पाणंद रस्ता कामास प्रारंभ झाला. यावेळी शिवाजी मुटकुळे, माणिक लोडे, हरदीप भाटिया, अमोल घोंगडे, मंजूताई हटकर आदी. ----------- नर्सीत दोन पाणंद रस्त्यांच्या कामाला प्रारंभ --------- हिंगोली, ता. ४ : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतातील उत्पादित माल घरी आणण्यासाठी चांगल्या रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील नरसी नामदेव येथे मुख्यमंत्री बळिराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत दोन पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरवात करण्यात आली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतापर्यंतचा प्रवास सुकर होणार असून, शेतमालाची वाहतूकही सुलभ होण्यास मदत मिळणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळिराजा पाणंद रस्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नरसी नामदेव येथे गुरुद्वारा ते कडुकाळा तलाव पाणंद रस्ता तसेच पहेनी फाटा ते पार्थळ पाणंद रस्त्याच्या कामाची सुरवात करण्यात आली. पाणंद रस्ते खराब असल्याने पावसाळ्यात शेतात जाणे, शेतीची कामे करणे आणि काढणी केलेला शेतमाल घरी आणणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते. अनेकदा वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचविण्यासही अडथळे निर्माण होत होते. आता या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. रस्ता कामाच्या प्रारंभी भाजप युवा मोर्चाचे शिवाजी मुटकुळे, माणिक लोडे, हरदीप भाटिया, मंडळ अधिकारी अमोल घोंगडे, ग्राम महसूल अधिकारी मंजूताई हटकर, भूमिलेख अधिकारी खोकले, सरपंच आसिफ पठाण, उपसरपंच ज्ञानेश्वर कीर्तनकार यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.