'राष्ट्रवादी'च्या मेहबूब शेखच्या अडचणीत वाढ, तपास रिपोर्ट नामंंजूर

मेहबूब शेख
मेहबूब शेख

औरंगाबाद : कायद्यानुसार तपास नाही व योग्य निष्कर्ष न काढल्याने मेहबूब इब्राहिम शेख याच्याविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याचा 'बी' समरी अहवाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी मंगळवारी (ता.२१) फेटाळून लावला आहे. मेहबूब शेख (रा.शिरुर, जि.बीड) हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nationalist Youth Congress President Mehbub Shaikh) आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल (B Summary Report) दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करुन अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सिडको पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी दिलेत. तसेच (Aurangabad) सदर प्रकरणाचा योग्य तपासासाठी औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी तपासावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्याचे न्यायालयाने सांगितले. पोलिसांनी बी समरी अहवाल सादर केला व त्यानंतर पीडितेच्या जबाबानुसार तिने घटनेनंतर संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मेहबूब शेख
Beed Rain : बीडमधील धानोरात शेती जलमय, पावसामुळे मोठे नुकसान

१५ जानेवारी २०२१ रोजी न्यायालयाने तिचा जबाब नोंदविला. त्यात मेहबूब शेखच्या नावाचा उल्लेख केला. मात्र आरोपी राजकारणी असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही. त्या उलट वारंवार पीडितेच्या घरी जाऊन तिचे चारित्र्यहनन केले. घटनेच्या वेळी तो नसल्याचा आरोपीच्या जबाबावर पोलिसांनी विश्वास ठेवला. बी समरी अहवाल नामंजूर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत अथवा सीबीआयमार्फत या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश द्यावेत, असा जबाब पीडितेने दिला होता. तिचे वकील एल.डी. मणियार यांनी पीडितेच्या जबाबाचा पुनर् उल्लेख केला. पोलिसांची बी समरी नामंजूर करुन पुढील तपासाचा आदेश देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com