esakal | विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेस

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दीड वर्षापासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यामध्ये सातत्याने तफावत आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. (Aurangabad News)

हेही वाचा: सावकारांची नावं लिहून तरुणांची आत्महत्या!; पाहा व्हिडिओ

‘मोदीजी शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा!’, ‘मोदीजी भाषणांचे वसीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे लसीकरण राबवा!’, ‘मोदी सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा!’ अशा घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्यांकडे वेधले जाणार आहे.

loading image
go to top