लातूर ः सकाळ यिनच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा अभियान राबवण्यात आले.
यावेळी प्रा. प्रीती पटवारी व प्रा. डॉ. क्रांती सातपुते यांचा सत्कार करताना दीप्ती पिंप्रे, अंकिता गिरी, गिता चव्हाण, प्रतिभा भिसे, उत्कर्षा चव्हाण.
सकाळ यिन लोगो
सकाळच्या यिनतर्फे ‘नवदुर्गा अभियान’
-
लातूर : विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
लातूर, ता. २० ः दैनिक सकाळच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘नवदुर्गा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा लातूर यिन कोअर टीमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुलाबपुष्प आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमात दयानंद महाविद्यालयातील प्रा. डॉ. क्रांती सातपुते, प्रा. प्रीती पटवारी, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, प्रा. निर्मला कोरे, हेड कॉन्स्टेबल कल्पना जाधव, लता बनसोडे, मनिषा महाबोले, अनुराधा म्हेकरे, मंगल पारवे, सुनीता गायाकवाड सूर्यवंशी, सफाई कामगार तसेच कला व क्रीडा क्षेत्रांत कार्यरत महिलांचा यिन सदस्यांनी सन्मान केला. समाजाच्या विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
महिलांचे कार्य, त्यांचे समर्पण आणि समाजाप्रति असलेले योगदान यांचा गौरव करताना गुलाब व तुळशीचे रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. आपल्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आल्याने सन्मानित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, महिलांच्या योगदानाचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. यावेळी दीप्ती पिंपरे, प्रतिभा भिसे, अंकिता गिरी, प्रशांत सूर्यवंशी, स्वस्ती मानकोसकर, शंतनू दैतने, गीता चव्हाण, समर्थ शिंदे, उत्कर्षा चव्हाण, राज होळकर, यिन अधिकारी अमर साखरे यांनी या उपक्रमाकरिता पुढाकार घेतला.
-----------