लातूर : श्री जय जगदंबा मंदिर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त कुंकुमार्चन पूजा करताना वीरशैव तेली समाज महिला समितीच्या पदाधिकारी, सदस्या, भाविक.
-
जय जगदंबा माता मंदिरात कुंकुमार्चन पूजा
-----
नवरात्र महोत्सवानिमित्त वीरशैव तेली समाज महिला समितीतर्फे आयोजन
--
लातूर, ता. १४ : गंजगोलाई भागातील श्री जय जगदंबा मंदिर येथे वीरशैव तेली समितीच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त कुंकुमार्चन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचे औचित्य साधून उपस्थित महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या, ज्यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. या मंगलमय कार्यक्रमाला समाजातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील सुमारे १५० ते २०० महिलांनी एकत्र येत श्री जय जगदंबा मातेची मनोभावे कुंकुमार्चन पूजा केली. यावेळी सामुदायिक मंत्रोच्चार आणि आरतीने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव तेली समाज महिला समितीच्या प्रमुख सारिका क्षीरसागर, समितीच्या सदस्या प्राजक्ता लोखंडे, अश्विनी लोखंडे, अनुसया देशमाने, वनिता व्यवहारे, रागिणी लोखंडे, रेखा कलशेट्टी, सुनीता नाईक, दीपाली नवगिरे आणि रोहिणी लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
---