टुडे मेन करावी
-----
LTR26B15229 लातूर ः येथील गंजगोलाईतील जगदंबा देवी.
LTR26B15230 झिंगणप्पा गल्लीतील जयभवानी माता.
येLTR26B15231 शहरातील गांधी मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेल्या देवीच्या मूर्ती.
LTR26B15232 येथील बसस्थानकामागे असलेल्या अंबिका देवी मंदिरात करण्यात आलेला मंदिराचा देखावा.
---
भक्ती, श्रद्धा अन् उत्साहाचा संगम
----
आजपासून आदिशक्तीचा जागर; ४८७ मंडळांकडून होणार देवीची प्रतिष्ठापना
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १० ः आदिशक्तीच्या आराधनेचा आणि भक्तीचा जागर घडविणाऱ्या नवरात्र महोत्सवाला आजपासून लातूर जिल्ह्यात उत्साहात प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून विधिवत घटस्थापना करण्यात येणार असून, पुढील नऊ दिवस जिल्ह्यात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. जिल्ह्यातील ४८७ सार्वजनिक मंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
नवरात्र महोत्सव हा शक्तीची उपासना करण्याचा आणि स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा महत्त्वाचा सण मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा-अर्चा केली जाते. त्यामुळे भाविकांमध्ये नवरात्रोत्सवाबाबत विशेष उत्साह असतो. घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीची स्थापना करून विधिवत पूजन केले जाणार आहे. अनेक भाविक नऊ दिवस उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना केली जाणार आहे.
---
मंडळांकडून जय्यत तयारी
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून देवीच्या आगमनासाठी मंडप उभारणी, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि पूजेच्या साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही मंडळांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात ४८७ मंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यात शहरी भागात १८६ व ग्रामीण भागात ३०१ मंडळाचा समावेश आहे.
---
बाजारपेठ पूजेच्या साहित्याने सजली
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही लगबग वाढली आहे. घटस्थापनेसाठी लागणारी मातीची भांडी, कलश, नारळ, फुले, हार, पूजेचे साहित्य, फळे आणि इतर आवश्यक वस्तूंची दुकाने सजली आहेत. घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू असून, खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र आदिशक्तीचा जागर घुमणार आहे. नऊ दिवस जिल्ह्यात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण राहणार आहे.
-----