नवरात्रोत्सवानिमित्त ११ ऑक्टोबरपासून संगीत महोत्सव

नवरात्रोत्सवानिमित्त ११ ऑक्टोबरपासून संगीत महोत्सव
Published on: 
नवरात्रोत्सवानिमित्त ११ ऑक्टोबरपासून संगीत महोत्सव डॉ. श्रीरंग देशपांडे यांचा पुढाकार : नामवंतांसह उदयोन्मुख शास्त्रीय गायक-वादकांना ऐकण्याची संधी छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : नवरात्रोत्सवानिमित्त डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित संगीत महोत्सवाला येत्या ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवाचे हे २७ वे वर्ष असून नव्या दमाच्या आणि उदयोन्मुख शास्त्रीय गायक-वादकांना ऐकण्याची संधी या महोत्सवामुळे मिळणार आहे. डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदादेखील या महोत्सवात अनेक तरुण आणि उमदे कलावंत आपली कला सादर करणार आहेत. दीपश्री, २५ भाग्यनगर येथे हा महोत्सव होणार असून ११ तारखेला रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद यांच्या हस्ते सायंकाळी सातला महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. पहिल्या दिवशी स्वर प्रभुगावकर आणि पं. धनंजय जोशी यांचे गायन होईल. नवरात्राचे नऊ दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात दत्ता गोगटे, मंगेश कुलकर्णी, दिनेश डोळे, व्यंकटेश पंडित, रुद्र केचे, कृष्णा सव्वाशे तबल्याची साथसंगत करतील. तर जयंत नेरळकर, दिलीप दोडके, गजानन केचे आणि दिनेश डोळे संवादिनीवर साथ देतील. प्रशांत अपसिंगेकर, रूपाली पाटील, नागेश अंकुश आणि प्रवीण शर्मा सूत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळतील. ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणारे कार्यक्रम ः ता.११ ः स्वर प्रभुगावकर आणि पं. धनंजय जोशी यांचे गायन. ता.१२ ः संमीहन जोशी यांचे तबला वादन, कल्याणी जोशी यांचे गायन. ता.१३ ः संकल्प काळे आणि युगंधरा केचे यांची गायन मैफल ता.१४ ः ईश्वरी कुलकर्णी यांचे गायन, सनतकुमार बडे यांचे पखवाज वादन, अफजल हुसेन यांचे धृपद गायन ता.१५ ः मनाली गर्गे आणि पं. भरत तेलंग यांचे गायन. ता.१६ ः चैत्रा अध्यापक आणि आदिनाथ पाटील यांचे गायन ता.१७ ः सुरभी परांजपे यांचे शास्त्रीय गायन आणि सुनील कुलकर्णी यांचे नाट्यगीत. ता.१८ ः अथर्व केचे यांचे बासरीवादन आणि पं. विश्वनाथ ओक, राजश्री ओक यांचे गायन ता.१९ ः डॉ. गुंजन शिरभाते यांचे व्हायोलिन वादन आणि पं. शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय गायन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com