घरोघरी आद्यशक्तीच्या आगमनाची लगबग स्वच्छता पूर्ण, घटस्थापनेच्या तयारीत गृहिणी व्यस्त

घरोघरी आद्यशक्तीच्या  आगमनाची लगबग स्वच्छता पूर्ण, घटस्थापनेच्या तयारीत गृहिणी व्यस्त
Published on: 
आद्यशक्तीच्या आगमनाची घरोघरी लगबग धाराशिव, ता. १० ः शारदीय नवरात्रोत्सवाला अवघे काही तास उरले असताना, शहरासह ग्रामीण भागात घरोघरी नवरात्राच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आद्यशक्ती जगदंबेची सेवा आणि उपासना करण्याचा हा उत्सव असल्याने प्रत्येक घरात धार्मिक वातावरणासोबतच मोठा उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. नवरात्रात देवीचे आगमन होणार या श्रद्धेने गेल्या आठवडाभरापासून घरोघरी स्वच्छतेची कामे वेगाने सुरू आहेत. गृहिणींकडून घराची कानाकोपऱ्यातून साफसफाई केली जात असून, देवाचे घर, पितळी भांडी अन् पूजा साहित्य लखलखीत केले जात आहे. अनेक घरांमध्ये उत्सव अधिक प्रसन्न वाटण्यासाठी दारांना नवा रंग आणि रोषणाईची तयारी करण्यात आली आहे. नवरात्रातील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे घटस्थापना, यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांनी सुरवात केली आहे. घटासाठी लागणारी काळी माती, तांब्याचा किंवा मातीचा घट, तसेच पेरणीसाठी लागणारे सात प्रकारचे धान्य जसे की गहू, जवस, तीळ, मूग आदी जमा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अखंड नंदादीपासाठी तेल-वाती, नारळ, पानांचे विडे, कुंकू, रांगोळी आणि देवीचे नवीन वस्त्र यांची खरेदी गृहिणींनी पूर्ण केली आहे. नवरात्र हा केवळ धार्मिक सण नसून कुटुंबाला एकत्र आणणारा आणि उत्साहाची नवी ऊर्जा देणारा सण आहे. शहरात आणि ग्रामीण भागात प्रत्येक घराघरांतून होणाऱ्या या पूर्वतयारीमुळे सर्वत्र मांगल्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com