एनसीएमसी कार्डची अट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल

एनसीएमसी कार्डची अट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल
Published on: 
‘एनसीएमसी’ कार्डची अट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल --------- राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय; महिलांना मोठा दिलासा गंगाखेड, ता.६ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सक्ती आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप या कार्डची नोंदणी किंवा वितरण न झालेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक ऑक्टोबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांसाठी सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता अद्याप केवळ १.१० कोटी कार्डांची नोंदणी व वितरण झाले. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोचली नसल्याने त्यांची नोंदणी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महामंडळाने महिला लाभार्थ्यांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्याची अट सात नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी आपल्या एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले. कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शिबिरांत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला प्रवाशांनी या मुदत वाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर कार्ड नोंदणी पूर्ण करावी. असे आवाहन करण्यात आले आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.