एनसीएमसी कार्ड नोंदणी, जनजागृती शिबिराला प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, ता. १३ ः मराठवाडा लिगल ॲण्ड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर एलिटच्या सहकार्याने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी व जनजागृती शिबिर घेण्यात आले. भारत सरकारच्या ‘एक देश एक कार्ड’ संकल्पनेअंतर्गत आयोजित शिबिराला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ८० विद्यार्थिनींनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली.
शिबिरात विद्यार्थिनींना एनसीएमसी कार्डचे महत्त्व, उपयोग, नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसटी बससेवेतील प्रवास अधिक सुलभ व डिजिटल पद्धतीने करण्यासाठी कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. एक कार्ड अनेक सेवा या संकल्पनेमुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अन्विता अग्रवाल, विद्यार्थी संसद प्रमुख प्रा. डॉ. सुनंदा चक्रानारायण, डॉ. रमा दुधमांडे, प्रा. माधुरी भावसार, प्रा. उज्ज्वला सातदिवे, प्रा. अश्विनी शहाणे, प्रकल्प अध्यक्षा डॉ. सुनीता बाजपाई तसेच रोटरियन स्वाती स्मार्त यांचे सहकार्य लाभले. रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.