
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजघडीला कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाची चर्चा नाही. परंतु, निर्णयासंदर्भात भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारात घेतले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (ता.१८) सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, भाजप नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.