​उमरगा येथे ‘एनईपी-२०२०’ वर आधारित एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

​उमरगा येथे ‘एनईपी-२०२०’ वर आधारित एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
Published on
UMR26A18376 उमरगा : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित ‘एनईपी-२०२०’ कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सय्यद अझरुद्दीन. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, पद्माकरराव हराळकर, डॉ. सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे व इतर. शिवाजी महाविद्यालयात ‘एनईपी-२०२०’ वर कार्यशाळा ​उमरगा, ता.१२ (बातमीदार) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम, बहुविषयक अध्ययन आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षणात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले. ​डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आणि मल्टिपल एन्ट्री-मल्टिपल एक्झिट सिस्टीम या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. उद्‍घाटन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे सचिव पद्माकरराव हराळकर, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अस्वले यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यशाळेतील पहिल्या सत्रात नांदेड येथील प्रा. डॉ. डी. एन. मोरे यांनी ‘मल्टिपल एन्ट्री-एक्झिट’ प्रणालीवर प्रकाश टाकला. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रवेश घेण्याची, बाहेर पडण्याची आणि पुन्हा शिक्षण सुरू करण्याची लवचिकता मिळणार असून उच्च शिक्षण खऱ्या अर्थाने विद्यार्थी-केंद्रित होईल, असे त्यांनी सांगितले. ​दुसऱ्या सत्रात अधिष्ठाता एम. के. पाटील यांनी क्रेडिट्सचे संकलन, हस्तांतरण आणि पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. तिसऱ्या सत्रात डॉ. गणेश काथार व डॉ. अनिल जाधव यांनी ऑन जॉब ट्रेनिंग व इंटर्नशिप या विषयावर, तर डॉ. लक्षकौशिक पुरी यांनी ''फील्ड प्रोजेक्ट्स''वर सखोल मार्गदर्शन केले. खुल्या चर्चेत प्राध्यापकांनी ‘एनईपी’च्या अंमलबजावणीतील प्रशासकीय व व्यावहारिक आव्हानांवर सविस्तर विचारमंथन केले. प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, डॉ. हनुमंत माने, डी. व्ही. माने, अनुराधा जगदाळे, सुभाष राठोड तसेच उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, डॉ. पद्माकर पिटले यांच्यासह तब्बल २६० प्राध्यापक उपस्थित होते. समन्वयक डॉ. डी. बी. ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चंद्रसेन करे यांनी आभार मानले. - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com