Vande Bharat: मुंबई छत्रपती संभाजीनगरसाठी तीन महिन्यांत नवीन ‘वंदे भारत’; गैरसोय होणार दूर, पिटलाइनचे कामही लवकरच
Sambhajinagar Mumbai Train: छत्रपती संभाजीनगर ते मुंबई दरम्यान तीन महिन्यांत नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होणार असून २८ ऑगस्टपासून जालन्याहून नांदेडकडे वंदे भारत धावण्यास सुरुवात होणार आहे. स्थानकावरील पिटलाइनसाठी वीज जोडणीचे काम शिल्लक आहे.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे जालन्याहून निघणारी वंदेभारत रेल्वे २८ ऑगस्टपासून नांदेडहून धावणार आहे. त्यात पुढील तीन महिन्यांत छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी नवीन वंदे भारत रेल्वे देण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शहरवासीयांना दिले.