News paper
Sakal
छत्रपती संभाजीनगर
दृष्टी केवळ 10 टक्के, आत्मविश्वास 100 टक्के! अल्बिनिझमग्रस्त सुनील ठरला आदर्श, वृत्तपत्र वाटून स्वयंरोजगार
अल्बिनिझमग्रस्त सुनील महाजन यांनी ९० टक्के दृष्टी गमावली असतानाही आत्मविश्वासाने वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय सुरू केला. संजयनगर येथील सुनील यांनी दिव्यांगपणाचे भांडवल न करता, जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
अल्बिनिझमग्रस्त आजाराने त्याची दृष्टी ९० टक्के गेली. पण, तो रडत-कुढत बसला नाही. हताशही झाला नाही. आता केवळ १० टक्के दृष्टी असताना १०० टक्के आत्मविश्वास घेऊन रोज सायकलवरून सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटतो. त्यामुळे हाताला काम नाही म्हणणाऱ्या तरुणांसाठी तो आदर्श ठरला. हा प्रेरणादायी प्रवास आहे तो संजयनगर येथील ४१ वर्षीय सुनील महाजन यांचा.