((फाेटो आहे ः ABD२६J८१३५७)))
(((फोटो ओळ))) नूतन कॉलनी ः वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करताना वृत्तपत्र विक्रेता बांधव.
(((लाेगो आहे ः ABD२६J८१३५६)))
----
वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त
ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान
--
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : नूतन कॉलनी येथे गुरुवारी (ता. १५) पहाटे साडेपाचला भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवाय ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वर्ष २०१८ पासून वाचन प्रेरणा दिवस आणि वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी असलेले दुष्काळाचे सावट लक्षात घेता वर्तमानपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम साध्या पद्धतीने झाला.
यावेळी ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) शिवप्रसाद क्यातमवार, वितरण प्रतिनिधी मनोज राठोड, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, वर्तमानपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष नीलेश फाटके, भाऊसाहेब घुगे, गणेश भोसले, भीमराव वायभट, माणिक कदम, शेख फईम, संतोष घायवट, दत्ता खरात, किशोर देशमुख, शेख कयूम, नारायण आहेर, प्रकाश देशपांडे, संदीप मोटे, विष्णू काळे, राजू गायकवाड, रामकृष्ण राऊत, कृष्णा काळे, आकाश कुलकर्णी, किशोर साळुंखे, मनोज जोशी, लक्ष्मण घुले, रामचंद्र कांबळे, शंकर गिरगावकर, अशोक जाधव, गजानन दामधर, भागवत साखरे, हनुमान देशमुख, वसीम भाई, अजय लिंगायत, अर्जुन रहिंज, संतोष देशपांडे, मोहम्मद अय्याज, दिलीप पवार, भारत पट्टेवार, आशिष ढमाळे, राहुल मस्के, रवी जाधव, विनोद जगताप आणि दीपक वैष्णव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या विक्रेता बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम होता.