Latur News: तलाठ्यांना पट्ट्याने बेदम मारहाण ,निलंगा तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी; सरकारी वाहनावर दगडफेक

Sand Mafia Attack: निलंग्यातील गिरकचाळ येथे अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर जमावाचा हल्ला; तलाठ्यांना मारहाण, वाहनाची तोडफोड, आठ जणांविरुद्ध गुन्हा.
A revenue team faced an alleged attack by a group during action against illegal sand mining in Girakchal village, Latur district.

A revenue team faced an alleged attack by a group during action against illegal sand mining in Girakchal village, Latur district.

esakal

Updated on: 

निलंगा, (जि. लातूर) : अवैध वाळू साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गिरकचाळ (ता. निलंगा) येथे गेलेल्या महसूल पथकावरच माफियांनी प्राणघातक हल्ला केला. माफियांच्या जमावाने शासकीय वाहनावर दगडफेक करत पथकातील तलाठ्यांना पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार २४ नोव्हेंबरला घडला. वाळूमाफियांची इतकी दहशत की, पुन्हा मारहाणीच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या पथकातील काहींना तक्रार न देताच पोलिस ठाण्यातून माघारी फिरावे लागले.

Loading content, please wait...