Nilesh Ghaiwal Gang : घायवळ गँगचा शार्प शूटर संतोष धुमाळ जेरबंद, पाचोड टोलनाक्यावर पाठलाग करीत अटक : पुणे पोलिसांच्या केले स्वाधीन

Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांनी संतोष धुमाळला पाचोड टोलनाक्यावर अटक केली, ज्याच्यावर १८ गुन्हे आहेत. तो एक वर्षांपासून पौंड पोलिसांच्या ‘वाँटेड’ यादीत होता.
crime
CrimeEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बीडकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे पुणे येथे जात असलेल्या एका शार्प शूटरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (ता.२६) पाचोड टोलनाक्यावर मुसक्या आवळल्या. संतोष आनंद धुमाळ (वय ४०, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) असे या गुंडाचे नाव आहे. धुमाळ हा पुणे येथील कुख्यात नीलेश घायवळ गँगमधील असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com