

Sakal
सिल्लोड तालुक्यातील नऊ महिन्यांच्या बाळाने खेळता-खेळता सेफ्टी पिन गिळली.
आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पिन काढली. बाळ सुखरूप पाहून आईचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलले.
डॉक्टरांनी बाळाला २४ तास देखरेखीखाली ठेवले आणि नंतर सुटी दिली.
सुषेन जाधव
खेळता-खेळता अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाने उघडे टोक असलेली सेफ्टी पिन गिळली. काय होईल, या भीतीने आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कुटुंबीयांनी तत्काळ बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत पिन काढली. आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप पाहून आईचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलले.