
पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाड्याच्या विकासाची तळमळ असल्याचे पाहून अॅड.देशमुख यांच्यावर जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषदेचे Marathwada Janta Parishad अध्यक्ष, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रदीप गोविंदराव देशमुख (वय ६७) Advocate Pradip Deshmukh यांचे शुक्रवारी (ता.१८) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. मुकूंदवाडी स्मशानभूमित त्यांच्यावर स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे Justice Ravindra Ghuge, ज्येष्ठ विधिज्ञ सतीश तळेकर Satish Talekar, खंडपीठ वकील संघाचे सचिव घाटोळ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ Padmabhushan Govindbhai Shroff यांनी मराठवाड्याच्या विकासाची तळमळ असल्याचे पाहून अॅड.देशमुख यांच्यावर जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्या माध्यमातून अॅड.देशमुख यांनी जायकवाडीला मिळणाऱ्या ८० ते ८२ टीएमसी पाण्याचा प्रश्न, विजयेंद्र काबरा यांच्या पाठबळाने मराठवाड्यातील Marathwada वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाटेला येणाऱ्या अपुऱ्या जागांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची बाजू न्यायालयात मांडली. त्यातून वैद्यकीयच्या १५०, तर अभियांत्रिकीच्या ७५० जागा वाढवून मिळाल्या. सिडकोला कुठल्या सुविधा मिळत नसल्याच्या प्रश्नावर दाखल याचिकेवरून खंडपीठाने अॅड. प्रदीप देशमुख यांच्या नावे आयोग स्थापन करून अहवाल मागवला व त्या आधारे एक स्यूमोटो याचिका दाखल करून घेतली.Noted Advocate Pradip Deshmukh Passes Away At 67 Age Aurangabad News
त्यातून मिळालेल्या आदेशामुळे सिडकोतील रस्ते, संत तुकाराम नाट्यगृह, बॉटनिकल गार्डन, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्नमार्गी लागले. अॅड.देशमुख यांनी राजीव गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन राजीव गांधी इंटलॅक्च्युअल फोरमची स्थापना केली. त्या माध्यमातून राज्यभर संघटन केले होते. मराठवाड्यातील बलस्थाने आणि दुर्बलता हा प्रकल्प हाती घेऊन परभणीचे डॉ. के. के. पाटील यांच्या सहकार्याने मोठा ग्रंथही तयार केला होता. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा विधिज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.