
छत्रपती संभाजीनगर : माझा आणि न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा परिचय वाचनातूनच झाला. त्यांचे मराठवाडा साहित्य परिषदेवर खूप प्रेम होते. मसापच्या पहिल्या दहा परिषदेच्या अध्यक्षांच्या भाषणांचे संपादन त्यांनी केले. साहित्य संमेलन घेणे हे साहित्य परिषदेचे काम, सरकारचे नव्हे, असे ठणकावून सांगणारे न्या. चपळगावकर यांनी सौम्य शब्दांमध्ये आपले विचार मांडले.