औरंगाबाद अनलाॅकच्या दिशेने; दुपारी दोनपर्यंत दुकाने राहणार उघडी

औरंगाबाद अनलाॅकच्या दिशेने; दुपारी दोनपर्यंत दुकाने राहणार उघडी
Summary

‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे सोमवारी (ता. ३१) रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत.

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची (Corona) संख्या कमी होत असल्याने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत महापालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे. आता ही दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळात सुरू राहतील. सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्‍यक कारणांशिवाय दुपारी ३ नंतर घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत (Break The Chain) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (District Collector Sunil Chavan), पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (Police Commissioner Nikhil Gupta), महापालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे सोमवारी (ता. ३१) रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत. शहर (Aurangabad) व जिल्ह्यासाठी मंगळवार (ता.एक) पासून १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्या आस्थापना, दुकानांना दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सुट देण्यात आली आहे त्यांनी अडीच वाजेपूर्वी सर्व हिशेब व पूर्ण कार्यवाही करून दुकान बंद करावे. त्यानंतर दुकान उघडे दिसल्यास दंडात्मक कारवाई करून कोविड महामारी संपेपर्यंत दुकान, आस्थापना सील केली जाईल, असा इशारा या आदेशात दिला आहे. (Now All Shops Open Till Two Noon, Some Relaxation In Lock Down In Aurangabad)

औरंगाबाद अनलाॅकच्या दिशेने; दुपारी दोनपर्यंत दुकाने राहणार उघडी
मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री ठाकरेंकडून अपेक्षाभंग, जलीलांची टीका

नव्या नियमानुसार...

० यापूर्वीच्या १६ एप्रिल व १२ मे २०२१ रोजीच्या आदेशात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.

० जिल्हाभरातील बॅंकींग सेवा सर्व कामांच्या दिवशी सुरू राहतील.

० अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांशिवाय इतर दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७ ते दुपारी २ या वेळात सुरू राहतील. मात्र, शॉपिंग सेंटर्स आणि मॉल बंदच राहतील.

० रेस्टारंट, हॉटेल्स, बार, दारू विक्रीची दुकाने १६ एप्रिल व १२ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसारच राहतील. फक्त पार्सलसेवा व घरपोच सेवा देऊ शकतील. ई-कामर्समार्फत घरपोच वस्तू व सेवा सुरू राहतील.

० महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील कोरोनाविषयक व अत्यावश्यक कामकाज करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.

० कृषी संबंधित दुकाने व त्यांच्याशी संबंधित बियाणे, खते , उपकरणे व शेती औजारांशी संबंधित देखभाल दुरूस्ती सेवांच्या आस्थापना, बाजार समिती आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ या वेळात सुरू राहतील.

० मालवाहतूक व माल पुरवठा करणाऱ्या आस्थापना, दुकानदार यांच्या मालवाहतुकीसाठी वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र दुकानदार, आस्थापनांनी माल साठवणूक करताना मालाची विक्री करू नये अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

० महापालिका क्षेत्रासहीत जिल्ह्यत वैद्यकीय सेवा किंवा इतर अत्यावश्यक कारणाशिवाय दुपारी ३ वाजेच्या नंतर नागरीकांना घराबाहेर पडता येणार नाही. ३ वाजेनंतर पूर्णपणे संचारबंदी राहील. घरपोच सेवा देण्यासाठी यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com