Nylon Manja : नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, १७ टाके पडले
Chh. Sambhajinagar : चंपा चौक परिसरात नायलॉन मांजामुळे मोहम्मद इमाद यांच्या डोळ्याखालपासून कानापर्यंतचे भाग कापले गेले. या घटनेत १७ टाके पडले आणि इतर सहा जण जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर : चंपा चौक परिसरात दुचाकीस्वारासमोर अचानक पतंगाचा मांजा आल्याने तरुणाच्या डोळ्याखालच्या भागापासून कानापर्यंतचा भाग अक्षरशः कापला गेला. मोहम्मद इमाद (वय २७, रा. नंदनवन कॉलनी) असे या जखमीचे नाव आहे.