Nylon Manja Birds Injured sakal
छत्रपती संभाजीनगर
Nylon Manja : नायलॉन मांजा उठला पक्ष्यांच्या जिवावर
Bird Injuried : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. काही पक्षी गंभीर जखमी झाले असून वन विभागाने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मकरसंक्रांतीच्या आधी पतंगाचा हंगाम सुरू होतो. याचदरम्यान मोठ्या प्रमाणात मुले गच्चीवर, रस्त्यांवर आपल्याला पतंग उडविताना दिसतात. यंदाही नायलॉन मांजात अडकून अनेक पक्षी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात काही पक्ष्यांचा जीव गेला, तर गव्हाणी घुबड, कोकिळा, पोपट, पारवे या पक्ष्यांवर वन विभागाच्या उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत.

