
दिलीप दखणे
वडिगोद्री : मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देण्यात येऊ नये, ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊ नये, निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे समीतीला मुदत वाढ देण्यात येऊ नये, हैदराबाद ,सातारा, संस्थानचे गॅझेटियर लागु करू नये आदी मागणी साठी सोनिया नगर अंतरवाली सराटी ता.अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव करीता उपोषण सोमवार ता.1 रोजी सुरु करण्यात आले आहे.