जुना मोंढा भागातील दोन मोठ्या पेढ्यांवर छापे; सषंयास्पद साठा जप्त करत खळबळ

जुना मोंढा भागातील दोन मोठ्या पेढ्यांवर छापे; सषंयास्पद साठा जप्त करत खळबळ
Published on: 
जुना मोंढा परिसरातील दोन पेढ्यांवर छापे, संशयास्पद साठा जप्त सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २९ ः अन्न व औषध प्रशासनाकडून जुना मोंढा परिसरातील दोन प्रमुख होलसेल पेढ्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईत निकृष्ट, पॅकेजिंग नसलेला आणि संशयास्पद दर्जाचा तब्बल ६९ हजार ४८० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अ. भ. गाढे यांनी जुना मोंढा भागातील मे. मंगळमूर्ती ट्रेडिंग कंपनी या होलसेल वितरकावर छापा टाकला. तपासणीत ही पेढी बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दराने अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे उघड झाले. अयोग्य साठवणूक, कच्च्या मालाच्या खरेदी नोंदींचा अभाव आणि कामगारांच्या वैद्यकीय दाखल्यांची कमतरता अशा अनेक कायदेशीर त्रुटी येथे आढळल्या. या पेढीतून कोडो मिलेट या अन्नपदार्थाचा एक नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ३८८ किलो (किंमत ६,२८० रुपये) साठा जप्त करण्यात आला. विक्रीस प्रतिबंध घालत या पेढीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापाठोपाठ २८ ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अ. भ. गाढे, अं. दि. नरवाडे आणि सि. सु. खंदारे यांच्या पथकाने मे. सतीश ओमप्रकाश मिटकरी'' या पेढीची तपासणी केली. तेथे साठवलेल्या गोल्डन सीडलेस बेदाण्यांच्या १० किलोच्या बॉक्सवर कोणतीही पॅकेजिंग तारीख किंवा बॅच नंबर छापलेला नसल्याचे निदर्शनास आले. गुणवत्तेबाबत संशय बळावल्याने जनहितासाठी १५८ किलो (किंमत ६३,२०० रुपये) बेदाणे जप्त करून सीलबंद करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी उत्पादक व विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com