Body Donation : वैजापूर येथे वडिलांच्या स्मृतिदिनी मुलगा, सुनेचा देहदानाचा संकल्प
Vaijapur News : सफियाबादवाडीतील सेवानिवृत्त जवान सुखदेव जाधव यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या मुलगा-सुनेने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. हा निर्णय समाजसेवेचा वारसा जपणारा आणि सामाजिक बांधिलकी दाखवणारा आहे.
शिऊर बंगला : वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथील सेवानिवृत्त जवान सुखदेव हौशबा जाधव यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मुलगा नितीन आणि सून सोनाली जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.