
उमरगा : यांत्रिकी शेती पद्धतीत नाविण्यात आल्याने पारंपारिक पद्धतीने शेतीमशागतीला मर्यादा आल्या; तरीही बैलजोडी शेतकऱ्यांसाठी ‘धनलक्ष्मी’ असल्याने पशुधन वाढीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करताहेत. पशू प्रदर्शनाच्या माध्यमातूनही एका पेक्षा एक सरस बैलजोड्यांसह दुभत्या जनावरांची पारख करायला मिळत आहे. उमरगा पालिकेकडून गेल्या पंधरा वर्षांपासून पशू प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे पालिकेने यात सहभाग घेतला नाही. बिरुदेव देवस्थान पंचकमेटीने नियमावलीचे पालन करत सलग दुसऱ्या वर्षी भरविलेल्या पशू प्रदर्शनात जवळपास सात हजार विविध जातींची जनावरे दाखल झालेली आहेत.
उमरगा- लातूर मार्गावरील श्री बिरुदेव मंदिराच्या परिसरात २६ जानेवारीपासून पशू प्रदर्शन सुरू झाले आहे. कर्नाटक राज्यासह उमरगा, निलंगा, औसा, देवणी, सोलापूर, विजापूर आदी भागांतील विविध जातींची पिळदार शरीरयष्टीची देखणी जनावरे पशू प्रदर्शनात दाखल झाली आहेत. गेल्या दहा दिवसांत जनावरांच्या खरेदी-विक्रीतून दोनशे दाखले देण्यात आली. त्यातून जवळपास एक कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. पावणेदोन लाखांची बैलजोडी! लाखमोलाची बैलजोडी सांभाळणारे अनेक हौशी शेतकरी आहेत. पशू प्रदर्शनात दोन दाती ते सहा दाती खिल्लार, लालकंधारी, देवणीसह ज्वार जातीची बैलजोडी दाखल झाल्या आहेत. उत्कृष्ट बैलजोड्यांची किंमत सत्तर हजार ते दीड लाखापर्यंत आहे. तर साधारण बैलजोडी पन्नास ते सत्तर हजार रुपयांपर्यंत आहे.
दीड लाख किमतीच्या तीन बैलजोड्या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या. एकुरग्याचे शेतकरी विक्रम लिंबाळे यांनी येणेगुरचे व्यापारी माणिक मुल्ला यांच्याकडून पावणेदोन लाखाची खिल्लार बैलजोडी खरेदी केली. अणदूरचे शेतकरी अरविंद मुळे यांनी अधिक वय झालेल्या दोन बैलजोडीचा सौदा करून बालाजी धुमाळ या व्यापाऱ्याकडून एक चांगली बैलजोडी घेतली. कोरेगाववाडीचे शेतकरी भगवान माने यांनी एक लाख ५५ हजारांची देवणी बैलजोडी खरेदी केली. दरम्यान, दुभत्या पशुधनाबरोबरच संकरित आणि ज्वारी गायी, म्हैस, भुरा म्हैस यांच्या किमतीही पन्नास ते सत्तर हजारापर्यंत आहेत. दहा दिवसांच्या कालावधीत विविध जातीच्या जनावरे खरेदी- विक्रीतून जवळपास एक कोटीची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती माजी नगरसेवक मधुकर घोडके यांनी दिली. बालाजी माणिक घोडके, बालाजी दिनकर घोडके, व्यंकट घाटे, आदम पाटील माडजकर, परमेश्वर दळगडे यांच्या देखरेखीखाली पशू प्रदर्शन सुरू असून, साधारणतः दहा तारखेपर्यंत जनावरांचा बाजार सुरू राहणार आहे.
व्यापाऱ्यांची संख्याही वाढली!
राज्य, परराज्यात होणाऱ्या पशू प्रदर्शनातून खरेदी- विक्रीच्या व्यवहारात व्यापारी हा दुवा महत्त्वाचा असतो. औश्याचे व्यापारी अलिशेठ कुरेशी, इसामुदिन कुरेशी यांच्यासह जवळपास दिडशे व्यापाऱ्यांनी विविध जातींचे जनावरे दाखल केली आहेत.
तीन लाखांचा घोडा वेधतो लक्ष !
माळेगावचा घोड्याच्या बाजार सर्वांना परिचित आहे. या भागात घोड्याची खरेदी- विक्री अगदी कमी असते. औश्याचे व्यापारी ईनायत सय्यद यांनी मारवाडी जातीचा घोडा विक्रीला आणला आहे. या देखण्या घोड्याची किंमत तीन लाख सांगितले जाते. यापेक्षाही दहा ते पंचवीस लाखांपर्यंत घोड्याच्या किमती असल्याचे श्री. सय्यद यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांची संख्याही वाढली!
राज्य, परराज्यात होणाऱ्या पशू प्रदर्शनातून खरेदी- विक्रीच्या व्यवहारात व्यापारी हा दुवा महत्त्वाचा असतो. औश्याचे व्यापारी अलिशेठ कुरेशी, इसामुदिन कुरेशी यांच्यासह जवळपास दिडशे व्यापाऱ्यांनी विविध जातींचे जनावरे दाखल केली आहेत.
तीन लाखांचा घोडा वेधतो लक्ष !
माळेगावचा घोड्याच्या बाजार सर्वांना परिचित आहे. या भागात घोड्याची खरेदी- विक्री अगदी कमी असते. औश्याचे व्यापारी ईनायत सय्यद यांनी मारवाडी जातीचा घोडा विक्रीला आणला आहे. या देखण्या घोड्याची किंमत तीन लाख सांगितले जाते. यापेक्षाही दहा ते पंचवीस लाखांपर्यंत घोड्याच्या किमती असल्याचे श्री. सय्यद यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.