गंगापूर : कार आणि दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला; तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. .गंगापूर-वैजापूर रोडवरील जखमतवाडी परिसरातील काटकर वस्तीसमोर मुद्देश वाडगाव (ता. गंगापूर) येथील निजाम बाबू शेख (वय ६५) आणि दीपक रूपचंद दारुंटे (वय ४०) हे दुचाकीवरून (एमएच २० जीएफ ६५९४) गंगापूरकडे आपल्या शेतीसाठी बियाणे खरेदीसाठी दुपारी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान येत होते. .यावेळी गंगापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच २० जीव्ही २७१२)च्या चालकाने निष्काळजीपणाने कार चालवून या मोटरसायकलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात निजाम बाबू शेख यांचा जागेवर मृत्यू झाला. तर, दीपक दारुंटे हा गंभीर जखमी झाला..त्याला जखमी अवस्थेत गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक करून त्याला पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले..Tuljabhavani Temple : मंदिर परिसरात स्वच्छता न राखल्यास कारवाई.बराच काळ नातेवाइकांचा पोलिस ठाण्यात ठिय्याघटनेची माहिती मिळाल्यानंतर निजाम बाबू शेख याचे नातलग मोठ्या संख्येने पोलिस स्टेशन व दवाखान्याजवळ जमा झाले. त्यांनी अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकाला त्वरित अटक करून गुन्हा दाखल करावा, ही मागणी धरून बराच वेळ ठिय्या दिला. अटक होईपर्यंत मृत निजाम शेख याच्यावर उत्तरीय तपासणी करू नये, अशी मागणी त्याच्या घरच्यांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.