Vaijapur Crime : खंडाळ्यात जुन्या वादातून तिघांवर चाकूहल्ला; एक ठार, दोघे गंभीर
Crime News : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे जुन्या वादातून तीन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला झाला. यात मोईन शहाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्या वादातून तीन तरुणांवर चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत.