
छत्रपती संभाजीनगर - गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी जन्मलेले बाळ म्हणजे मुदतपूर्व जन्माला आलेले बाळ असे म्हणतात. सध्या अशा जन्माला येणाऱ्या बाळांचे प्रमाण वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, सध्या १० पैकी एक बाळ मुदतीपूर्वी जन्माला येत असल्याचे समोर आले. अशा मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला (प्री-मॅच्युअर बेबी) गोल्डन अवर अर्थात पहिल्या तासात योग्य काळजी घेतल्याने या बाळांना निरोगी जीवन जगणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.