Education News: शिक्षकांनीच मांडलीय शिक्षणाची थट्टा; लामकाना तांडा शाळेची स्थिती, विद्यार्थी एकच अन् शिक्षक दोन
Chh. Sambhajinagar: आडगाव सरक केंद्रातील शाळेची अवस्था शिक्षण व्यवस्थेच्या गळतीचा गंभीर चित्र दर्शवते. एका विद्यार्थ्याच्या नावाखाली दोन शिक्षक नेमले असून त्यांच्याकडून कोणतीही शालेय कार्यवाही होत नाही.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आडगाव सरक केंद्रातील लामकाना तांडा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहता शिक्षण व्यवस्थेच्या गळतीचा आलेख किती गंभीर आहे, हे दिसून येते. या शाळेत सध्या फक्त एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे.