''एक गाव एक गणपती''ला २५६ गावांतून प्रतिसाद

''एक गाव एक गणपती''ला  २५६ गावांतून प्रतिसाद
Published on
जिल्ह्यातील २५६ गावांत ‘एक गाव एक गणपती’ एक हजार ६७० मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना; यंदा २० मंडळे वाढली सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १४ : गणरायाचे आगमन जल्लोषात झाले असून, गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदा सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमाला नागरिक तसेच गणेश मंडळांकडून प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील तब्बल २५६ प्रभागांमध्ये यंदा ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे. यंदा संपूर्ण जिल्ह्यात नोंदणीकृत १ हजार ६७० गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाची भव्य आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात नव्याने २० मंडळांची वाढ झाली असून, एकट्या धाराशिव शहरात १२१ सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. धाराशिव शहरात एकूण १२१ नोंदणीकृत गणेश मंडळे असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यातील प्रमुख ९८ मंडळांपैकी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५८ तर आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४० गणेश मंडळांनी अधिकृत अर्ज सादर केले असून, त्यांना नियमांनुसार लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. रस्त्यांवर रहदारीला व वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशा रीतीने पेंडॉल उभारण्याचे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत. ........ ((चौकट)) यंदा मुक्काम १२ दिवस यंदा गणरायाचा मुक्काम १२ दिवस राहणार असून त्यामुळे उत्सवात विविध उपक्रम राबविण्यास मंडळे प्राधान्य देत आहेत. मंडळांनी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे विशेष नियोजन केले आहे. तसेच, आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य मार्गांवर एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. शिस्तबद्ध नियोजन, प्रशासकीय सहकार्य आणि सामाजिक भान जपत धाराशिवकरांनी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरवात केली आहे. ....... ((कोट)) गणेशमूर्तींच्या आगमनावेळी आम्ही डीजे लावला नाही. त्याऐवजी २५ मुलींच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीलाही डीजे लावला जात नाही. ढोल-ताशा वादनाद्वारेच मिरवणूक काढली जाते. यंदा मंडळाने श्री तुळजाभवानी मातेचा सजीव देखावा सादर करण्याचे नियोजन केले आहे. - सचिन जगदाळे, मार्गदर्शक, श्री साईनगर, धाराशिव ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com