esakal | मराठवाड्यात आयटीआयचे ऑनलाईन प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Online classes of ITI started in Marathwada

मराठवाडा विभागातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांतील एकूण ८२ आयटीआय संस्थांपैकी ८१ ठिकाणाहून सहा हजार ६४८ विद्यार्थी ऑनलाइन प्रशिक्षण घेत आहेत

मराठवाड्यात आयटीआयचे ऑनलाईन प्रशिक्षण

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोज दोन तास प्राध्यापकांनी ऑनलाइन शिकवावे; तसेच त्यांच्या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

म्हणून सध्या मराठवाडा विभागातील ८२ पैकी ८१ आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये सहा हजार ६४८ विद्यार्थी विद्यार्थी सक्रिय आहेत. 
शिक्षण विभागाच्या शाळा, महाविद्यालयांप्रमाणेच आयटीआयमधील विद्यार्थ्यांनाही लॉकडाउनचा फटका बसला आहे. तीन मेपर्यंत लॉकडाउन लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके आणि सैद्धांतिक विषयांचे मार्गदर्शन ऑनलाइन देण्यात येत आहे. व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्या 'लर्निंग मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम'च्या माध्यमातून अभ्यास साहित्य तयार केले आहे. 
वर्कशॉप कॅल्क्युलेशन', 'वर्कशॉप सायन्स', 'इंजिनिअरिंग ड्रॉइंग', 'एम्प्लॉयबिलिटी स्किल्स', 'फिटर', 'टर्नर' यासह २३ विषयांचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिक्षक त्याचा वापर करून इंटरनेट आणि व्हिडिओ कॉलिंग कॉन्फरन्स प्रणालींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान   

मराठवाडा विभागातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांतील एकूण ८२ आयटीआय संस्थांपैकी ८१ ठिकाणाहून सहा हजार ६४८ विद्यार्थी ऑनलाइन प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी युट्यूब, गुगल कॅम, झूम, व्हॉट्सॲप अशा माध्यमांचा उपयोग केला जात आहे. 

आश्चर्य वाचा -  आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार  

सध्या मराठवाड्यातील ८१ आयटीआयमध्ये ऑनलाइन क्लास सुरू झाल्याने विद्यार्थी व शिक्षक हे संपर्कात आहेत. लॉकडाउनमुळे ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे. शिकवलेल्या अभ्यासक्रमाची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. 'आयटीआय'ची वार्षिक परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे, त्यामुळे कोरोनाचा परीक्षांवर फरक पडण्याची शक्यता कमी आहे. 
प्रा. अभिजित ए. आल्टे (प्राध्यापक, आयटीआय औरंगाबाद)