ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम

ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
Published on: 
ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम ------------------------ खेत बचाओ अभियानांतर्गत १७० हून अधिक शेतकरी ऑनलाइन सहभागी सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र तथा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खेत बचाओ अभियान- २०२६ अंतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. दुष्काळसदृश्य परिस्थितीत हळद पिकाचे नुकसान टाळून उत्पादन व गुणवत्ता टिकविण्यासाठी जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम वापर, पाण्याचे योग्य नियोजन आणि आच्छादन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हळद पीक व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. जितेंद्रकुमार कदम यांनी शुक्रवारी (ता.सहा) केले. १२३ व्या भागात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. हळद पीक व्यवस्थापन : दुष्काळसदृश्य परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. कदम यांनी हळद पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार पाण्याचे नियोजन करण्याचे महत्त्व विशद केले. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी आच्छादनाचा वापर, उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, तण नियंत्रण, पिकाच्या वाढीवर नियमित लक्ष ठेवणे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. हळद पिकाच्या कंदवाढीच्या अवस्थेत पाण्याचे योग्य नियोजन करणे विशेष महत्त्वाचे आहे. पिकाला गरजेनुसार पाणी देऊन अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळावा. उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करून जमिनीतील ओलावा कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. या उपाययोजनांमुळे प्रतिकूल हवामानातही पिकाचे नुकसान कमी करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी परिस्थितीनुरूप शास्त्रीय पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असेही त्यांनी नमूद केले. ((चौकट))) तज्ज्ञांनी केले शंकांचे निरसन या कार्यक्रमात मराठवाड्यातील १७० हून अधिक हळद उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांनी हळद पीक व्यवस्थापनासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून शंकांचे निरसन करून घेतले. प्रतिकूल हवामान परिस्थितीत हळद पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकविण्यासाठी उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन या संवादातून मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम लाभदायी ठरला. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.