वरुड चक्रपाणचा पाणंद रस्ता खुला करा

वरुड चक्रपाणचा पाणंद रस्ता खुला करा
Published on: 
वरुड चक्रपाणचा पाणंद रस्ता खुला करा ------- शेतकऱ्यांची महसूलमंत्र्यांकडे धाव; आत्मदहनाचा इशारा सेनगाव, ता. ५ (बातमीदार): तालुक्यातील वरुड चक्रपाण येथील एका शेतकऱ्याने शेताकडे जाणारा पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी निवेदनाद्वारे महसूलमंत्र्यांकडे केली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास १५ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात न्यायालयीन आदेश, शासकीय मोजणी, हद्दखुणा व स्थळ पाहणी होऊनही प्रत्यक्ष रस्ता खुला करण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकरी केशव कोटकर यांच्या निवेदनानुसार २७ मे २०२५ रोजी दिवाणी न्यायालयाचा आदेश झाला. त्यानंतर २६ मार्च २०२६ रोजी गट क्रमांक १०० ची शासकीय मोजणी करण्यात आली. २७ एप्रिल रोजी हद्दखुणा करण्यात आल्या, तर २५ मे रोजी स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आला. तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध अर्ज करूनही रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्याच्या प्रश्नावर २८ जुलै रोजी कलम १३८ अनुषंगाने तसेच ३ ऑगस्ट रोजी प्रशासनाकडे अर्ज केल्याचेही निवेदनात नमूद आहे. संबंधित प्रकरणाची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांमार्फत फेरतपासणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com