esakal | आईची माया! कोरोनाबाधित मुलांसाठी 'ती' राहू लागली कोविड सेंटरमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

आईची माया! कोरोनाबाधित मुलांसाठी 'ती' राहू लागली कोविड सेंटरमध्ये

आईची माया! कोरोनाबाधित मुलांसाठी 'ती' राहू लागली कोविड सेंटरमध्ये

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पुण्याहून गावाकडे परतलेल्या एका कुटुंबातील सात महिन्यांच्या बाळासह त्याच्या दोन बहिणी आणि वडील यांना कोरोना संसर्ग झाला. मात्र, आईच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. चिमुकला बाधित असला तरी आई दूर गेली नाही; तीनही लेकरांसोबत ती शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये आहे. निलंगा तालुक्यातील एका गावातील कुटुंब बुधवारी (ता.१४) सांयकाळी उमरग्यात आले होते. पतीला अस्वस्थ वाटू लागल्याने येथील कोविड रुग्णालयात चाचणी करण्यात आली.

त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने उपचार सुरू करण्यात आले. सोबत असलेली पत्नी व सात महिन्यांचा मुलगा व दोन मुलींना रात्री ईदगाह कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तिथे स्वयंसेवक ख्याजा मुजावर यांनी त्यांना स्वंतत्र खोलीत राहण्याची सोय केली. गुरुवारी आई व तीनही लेकरांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात तीनही मुलं कोरोना बाधित आढळले. आई मात्र निगेटिव्ह आली. पण, पोटच्या गोळ्यासाठी आई कोविड सेंटरमध्ये राहत आहे.