esakal | माणुसकीचा झरा! स्वखर्चाने 'ती' करतात मृतदेहांवर अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

माणुसकीचा झरा! स्वखर्चाने 'ती' करतात मृतदेहांवर अंत्यसंस्कार

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) काळात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. उमरग्यातील खासगी व सरकारी कोविड रुग्णालयातील मृत्यू झालेल्या व्यक्तीवर (Umarga Municipal Council) पालिकेच्या कामगारांकडून अंत्यविधी केले जात आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन मृतदेह ताब्यात देण्यात येत आहे. मात्र तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दाळींब येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पुढाकार घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. (Osmanabad Latest News They Completes Final Rituals On Corona Dead People In Umarga)

हेही वाचा: भाजप आक्रमक, मिनी घाटीत ऑक्सिजन प्लाँटचे प्रतिकात्मक उद्घाटन करुन केले आंदोलन

अत्यंत अवघड, दुःखद प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून सामाजिक आणि मानवतेच्या भावनेतून "मदतीचा खांदा" देणारे बाबा जाफरी, जावेद बिल्डर, अयाज पटेल, खासिम शेख, मौसिम कमाल, वाहिद मकानदार, इम्रान जहागिरदार यांना कोविड संसर्गबाधित अंत्यविधी करण्यासाठी संपर्क केल्यास तेथे जावून योग्य पद्धतीने कोविड नियमावली नुसार स्वखर्चाने अंत्यविधी करत आहेत. दरम्यान कलदेव निंबाळा येथे सोमवारी (ता.दहा) एका बाधित व्यक्तीचे निधन झाले. रात्री आठ वाजेच्या दरम्यान श्री. जाफरी त्यांच्या सहकाऱ्यांची खरी मदत झाली. स्वतःची गाडी, आवश्यक कीट साहित्य स्वखर्चाने त्यांनी केले.