esakal | कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने पतीचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षावर होणार 'हा' मोठा परिणाम...!
कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने पतीचा मृत्यू
sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या धक्क्याने अवघ्या ४८ तासांत पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव (कोठाळा) (हल्ली मुक्काम कळंब) येथील पती-पत्नी यांचा आरोग्य तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल (Corona Test Report) आल्याने त्यांना बीड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. शनिवार (ता.एक) औषधोपचार सुरू असताना पत्नीचा मृत्यू झाला. रुग्णलयात दोघेही शेजारी बेडवर उपचार घेत होते. पत्नीच्या जाण्याने पुढील आयुष्य कसे जगावे? या भितीपोटी बसलेल्या धक्क्यामुळे पतीचाही मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव (कोठाळा) येथील शेतकरी कुटूंबातील दोन मुले शिक्षक असून ते कळंब शहरात वास्तव्यास आहेत. (Osmanabad Live Updates Husband Dies After Listening to Wife Death Due To Corona)त्यांच्या आईवडिलांचा मागच्या चार दिवसांपूर्वी तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) अहवाल आढळून आला.

हेही वाचा: नैसर्गिक ऑक्सिजनसाठी हवीत घरासमोर तुळशी अन् परिसरात पिंपळ, वड

उस्मानाबाद जिल्ह्यात बेड, ऑक्सिजन आदी सुविधा उपलब्ध झाल्या नसल्या कारणामुळे पती-पत्नीला शिक्षक या दोन्ही मुलाने बीड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. आई वडिलांना कोरोनाच्या तावडीतून वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. डॉक्टर यांनी कोरोनाला हरविणारे इंजेक्शन सांगितले. ते लागलीच औरंगाबादहून अवघ्या दोन तासात या मुलांनी उपलब्ध करून आईला दिले. पण दुर्दैवाने आईचा शनिवारी मृत्यू झाला. कोरोनामुळे पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पतीच्या मनावर जोराचा आघात होऊन मोठा धक्का बसला. शेतकरी कुटुंबातील अतिशय गरीब परिस्थितीतून पती-पत्नीने आपल्या मुलांना शिक्षण देऊन शिक्षक बनविले होते. पत्नीचा मृत्यू झाला याचा धक्का सहन झाला नाही. पुढील आयुष्य कसे जगावे?मुलाचे, नातवाच कसे होणार याचे मनाला धक्के बसले. औषधोपचार सुरू असतानाच पत्नीच्या निधनाने अवघ्या ४८ तासांत पतीचे निधन झाले. रुग्णलयात दोघेही शेजारी बेडवर औषधोपचार घेत कोरोनासी लढत होते. कोरोनामुळे पत्नीचे निधन झाल्याच्या धक्क्यातून आणि भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका कुटुंबीय व शेजारील लोक व्यक्त करीत आहेत.