
छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात छत्रपती संभाजीनगर विभागातील म्हणजे मराठवाड्यातील बालगृहांतील मुलांनी सरस कामगिरी केली. महिला बालविकास विभागांतर्गत असलेल्या राज्यातील विविध संस्थांमधून यावर्षी ७३४ मुलांनी ही परीक्षा दिली. यात छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक २२२ मुले होती. ही सर्वच परीक्षेत यशस्वी झाली.