
छत्रपती संभाजीनगर : विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. त्यामुळे वर्ष २०१७ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ३९३ नागरिकांनी पासपोर्ट काढला. यातील अनेकांनी शिक्षण, व्यवसाय, नोकरी, व्यापार, उद्योग किंवा पर्यटन यापैकी एका कारणासाठी विदेशवारी केली.