
फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांवर मधमाशांकडून हल्ल्याचे सत्र १५ दिवसांपासून सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी पुणे येथील ५० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची घटना ताजी असताना शनिवारी (ता. सात) दुपारी दोनशेहून अधिक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला.