
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय युवा महोत्सव-२०२४ मध्ये विविध कारणांनी ३०५ महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी बुधवारपर्यंत (ता. तीन) एकूण २८ लाख १६ हजार ७६५ रुपये दंड जमा केला आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.