CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा
Student Success: सीए मे २०२५ च्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरातील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तिघा स्तरांमधून सात जणांनी देशपातळीवर विशेष कामगिरी केली.
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियापासून राहिलो दूर राहिलो, अभ्यासात सातत्य ठेवले. आवड म्हणून झोकून देत अभ्यास करतोय त्यामुळे हे यश पाहता आले, असे देशपातळीवर चमकलेल्या सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.