Hanuman Jayanti : भद्रा मारुतीचे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन
Khultabad News : भद्रा मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासून रात्रीपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले.
खुलताबाद : भद्रा मारुती मंदिरात शनिवारी (ता.१२) हनुमान जन्मोत्सव जय भद्राच्या जयघोषात साजरा झाला. पहाटेची आरती भद्रा मारुती संस्थानचे सचिव अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ यांच्या हस्ते करण्यात आली.