कल्याण मंडपम् येथील

कल्याण मंडपम् येथील
Published on: 
ऑक्सिजन प्लॅन्टमधील साहित्य चोरी गुन्हा दाखल करा, अन्यथा दिवाळीपूर्वी फटाके फोडू; नगरसेवकांचा इशारा ----- परभणी, ता. २७ : कोरोना काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टमधील साहित्य गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा दिवाळीपूर्वीच फटाके फोडू, असा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे. नगरसेवकांनी मंगळवारी (ता. २७) महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. कोरोना काळात उभारलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टचे साहित्य गायब झाले आहे. या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही महापालिकेने अद्याप कारवाई का केली नाही, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. महापालिकेने सुरू केलेल्या ५० खाटांच्या दवाखान्याच्या कामाबाबतही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. दवाखान्यात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी कोणता, निविदा कोणती आणि कामाला कोणत्या बैठकीत मान्यता देण्यात आली, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आर्थिक तडजोडी होत असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. जन्म-मृत्यू विभागातील कारभारावरही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. जुन्या कर्मचाऱ्यांना बाजूला करून नव्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यापासून प्रमाणपत्रांमध्ये चुका वाढल्याचा आरोप त्यांनी केला. हा विभाग तिन्ही प्रभाग समित्यांमध्ये कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम, मालमत्ता, स्वच्छता, विद्युत, नगररचना आणि नियोजन विभागांच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली. निवेदनावर रितेश झांबड, गटनेते विश्वजित बुधवंत, अद्वैत पार्डीकर, वैशाली दैठणकर, सुशीला थोरात, मीनाताई वरपुडकर, डॉ. केदार खटींग, गणेश टाक, गिरिजा आजेगावकर, निर्मला वाघमारे आणि सपना जुकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ----- ऑक्सिजन प्लॅन्टचे सर्व साहित्य गायब झाले. ते चोरीला गेले की कोणी गायब केले, हे समजण्यास मार्ग नाही. परिसरात सीसीटीव्ही असतानाही महापालिकेने कारवाई केलेली नाही. निवेदनानंतर आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांच्या चौकशीत सर्व स्पष्ट होईल. -रितेश जैन, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com